‘सागर’,‘सलाखे’, ‘क्रांतिवीर’, ‘शहंशाह’ ‘मैं खिलाडी तू अनाडी’, ‘अनाडी’, ‘१०० डे’ सारख्या चित्रपटांमधून बॉलीवूडमध्ये अधिराज्य गाजवणाऱ्या १७७ चित्रपटांसह हॉलीवूडच्या चार चित्रपटांचे कला दिग्दर्शक असलेले लीलाधर सावंत चित्रपटसृष्टीतील एक बडी आसामी. या क्षेत्रातील फिल्मफेअर सारखा उच्च पुरस्कार मिळवणारा हा अवलिया सध्या वाशीम जिल्ह्यातील जउळका रेल्वे (ता. मालेगाव) या एका छोट्याशा खेड्यात काळ्या मातीत राबत आहे. लख्ख चंदेरी दुनियेला सजवून राष्ट्रीय पुरस्कारावर आपले नाव कोरणारा हा कलावंत आता धरणीमातेला कोरत आपला आनंद शोधत आहे.
दैनिक दिव्य मराठीमध्ये आलेले वृत्त |
177 हिंदी आणि हॉलीवूडमधील चार इंग्रजी चित्रपटांचे कला दिग्दर्शन करणाऱ्या लीलाधर सावंत (५८) यांचा वर्ष १९८८ मध्ये ‘हत्या’ या चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्काराने गौरव झाला. दरम्यान, ‘कामचोर’साठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. लखलखी चंदेरी दुनियेला सजवणारे सावंत यांचे हात आता शेतात राबत आहेत. कोणत्याही चित्रपटातील ‘आॅलराउंडर’ व्यक्ती म्हणजे कला दिग्दर्शक. वेशभूषा, कथा, प्रसंग, काळ, वेळ, दिग्दर्शन, अभिनय, संगीत या सर्वस्पर्शी कलेला एकरूप करून चित्रपटाला वास्तववादी बनवण्यासाठी ती राबत असते. सावंत यांनीही याच क्षेत्रासाठी आपले आयुष्य वाहून घेतले होते. ते मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील. बीएफए झाल्यानंतर कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी त्यांनी सैन्यदलात नोकरी पत्कारली. पाचच वर्षांत राजीनामा देऊन मुंबई येथील एका कंपनीत सुरक्षा अधिकारी म्हणून कामाला लागले. याच कंपनीत जउळका येथील पुष्पा देशमुख नोकरीला होत्या. ३७ वर्षांपूर्वी त्यांच्याशी त्यांंचा प्रेमविवाह झाला. सावंतांच्या घरची परिस्थिती बेताचीच तर पुष्पा यांच्या वडिलांकडे ‘देशमुखी’. त्यातल्या त्यात आंतरजातीय लग्न. त्यामुळे या लग्नाला तीव्र विरोध झाला. आपल्या चित्रकलेच्या आवडीतून त्यांनी ही नोकरीही सोडून अत्यंत कमी पैशात पोस्टर्स रंगवण्याचे काम सुरू केले. यातून त्यांना आर. बर्मन यांनी ‘बेताब’ची हवेली बनवण्याचे काम दिले. पुढे ते इप्टा नाट्य संस्थेचे सेट मोफत करून देत. या काळात सलग तीन वर्षे सहायक कला दिग्दर्शक म्हणून त्यांनी तब्बल ४०० हिंदी चित्रपटांत काम केले. पुढे त्यांना मुख्य कला दिग्दर्शक म्हणून ‘बॉक्सर’ हा चित्रपट मिळाला. तेव्हापासून ते वर्ष २००८ पर्यंत त्यांच्या अनेक चित्रपटातील कला दिग्दर्शनाचा आलेख वाढत राहिला. सैन्यदल, सुरक्षा अधिकारी, पोस्टर रंगवणे, सेट तयार करणे, सहायक कला दिग्दर्शक अशा वेगवेगळ्या भूमिका समर्थपणे वठवत कला दिग्दर्शक म्हणून उंची गाठलेल्या सावंतांना अचानक ही ‘भूमिका’ सोडावी लागली आणि अनपेक्षित एक्झिट घेत त्यांनी एक खेडं गाठून नवीन भूमिका स्वीकारली.
‘पनाह’ची केली निर्मिती
सावंत हे ‘पनाह’ या चित्रपटाचे निर्माता आहेत. या चित्रपटात नसरुद्दीन शहा मुख्य भूमिकेत आहेत. आता ‘वासुदेव’ या कलात्मक मराठी चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सावंत हे ‘पनाह’ या चित्रपटाचे निर्माता आहेत. या चित्रपटात नसरुद्दीन शहा मुख्य भूमिकेत आहेत. आता ‘वासुदेव’ या कलात्मक मराठी चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
..
मराठीसाठी काम करता आले नसल्याची खंत
आपण मराठी असूनही एकाही मराठी चित्रपटासाठी काम करता आले नसल्याचे शल्य सावंत यांना अजूनही बोचत आहे. हिंदीतील कला दिग्दर्शक जास्त खर्च करायला लावतात, याच एका कारणाने आपल्याला मराठी चित्रपटांचे काम मिळाले नसावे, असे ते सांगतात.

कॅन्सर रुग्णालय सुरू करणार
जउळका रेल्वे येथे सर्व अद्ययावत कॅन्सर रुग्णालय सुरू करण्याची योजना सावंत दाम्पत्याने आखली आहे. यात गरीब रुग्णांवर अत्यंत माफक दरात उपचार केले जातील. त्यासाठी जागासुद्धा निश्चित झाली असून, लवकरच या कामास सुरुवात होणार आहे.

का सोडली चंदेरी दुनिया?
विशालहा सावंत यांचा एकुलता एक मुलगा. त्याने अनेक चित्रपटांत बालकलाकार म्हणून काम केले. त्याचा कर्करोगाने मृत्यू झाला. हे दु:ख सावंत दाम्पत्य सहन करू शकल्याने त्यांनी चंदेरी दुनिया सोडून जउळका रेल्वे गाठत शेती कसणे सुरू केले.
यांचा स्वभाव लहरी
लीलाधरहे सतत नवीन काही तरी करत असतात. त्यांचा स्वभाव प्रचंड लहरी आहे. एकवेळ त्यांनी घरात विषारी साप पाळण्यासाठी आणले. पण, वन विभागाने परवानगी नाकारली. नंतर ते जंगलात सोडले.- पुष्पा सावंत
लीलाधरहे सतत नवीन काही तरी करत असतात. त्यांचा स्वभाव प्रचंड लहरी आहे. एकवेळ त्यांनी घरात विषारी साप पाळण्यासाठी आणले. पण, वन विभागाने परवानगी नाकारली. नंतर ते जंगलात सोडले.- पुष्पा सावंत
----
विकास वि. देशमुख
करडा, रिसोड, वाशीम
(Vikas V. Deshmukh, Karda, tq. Risod, dist Washim)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा