बुधवार, ९ नोव्हेंबर, २०११

यांना आता..!



टाळ कुटू कुटू 
शिणले रे हात 
पिढ्यांचा हा घात 
केला कुणी...?

वारकरी भोळे
विचारला टाळे
अधू झाले डोळे 
विठ्ठलाचे..!

ओळख ग धोका 
वाचवा रे चोखा
तुका म्हणे ठोका 
यांना आता..!

-विकास वि. देशमुख (Vikas Deshmukh)
मु. करडा, पोस्ट मोठेगाव ता. रिसोड, जि. वाशीम 
9850602275

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा