कधीतरी... याच शब्दाभोवती मानवी आयुष्य आहे. हा शब्दच मुळात प्रचंड ऊर्जा देणारा. कधीतरी आपण असं करू. कधीतरी तसं होईल असं आपण म्हणतो; म्हणूनच आपण जगतो. मानवी आयुष्यातून जर हा आशावाद वजा झाला तर त्याच्या जगण्याला अर्थच उरणार नाही. एवढंच नाही तर त्याचं आयुष्यसुद्धा थांबलेलं असेल. त्यामुळेच माझा हा ब्लॉग ‘कधीतरी...'
मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०११
सोमवार, २१ नोव्हेंबर, २०११
'ये शहर अमन का'
कारंजालाड म्हटले की धार्मिक सहिष्णुता, सलोखा आणि शांत शहर अशीच प्रतिमा समोर येते. पण, 'सोशल नेटवर्र्किंग साईट' असलेल्या 'फेसबुक'वर एका धार्मिकस्थळाची विटंबना करणारे छायाचित्र प्रसारित झाले आणि शहराच्या उज्ज्वल प्रतिमेला तडा गेला. पण, लगेचच कारंजावासीयांनी आपल्या भावनेला आवर घालत धार्मिक सलोखा आणि निकोप समाजव्यस्थेसाठी परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याअगोदरच शांतता प्रस्थापित केली. त्यामुळे 'ये शहर अमन का' या उक्तीची पुन्हा एकदा प्रचिती आली. मात्र, या अनुषंगाने सोशल नेटवर्र्किंग साईटचा होत असलेला गैरवापर समोर आला आहे.
विज्ञानाचा विकास झाल्यामुळे जग चिमटीत आले. माणसाने विकासाची आकाशामागून आकाशे काबीज केली. त्यातूनच फेसबुक, ऑकरुट, गुगल प्लस आदींसह इतर काही सोशल नेटवर्किंग साईट अस्तित्वात आल्या. टीव्ही, वर्तमानपत्र यांना पर्यायी मीडिया म्हणून या साईटचा वापर केला जातो. यावर्षी जानेवारी महिन्यात इजिप्तमध्ये वेल घोनीम या युवकाने 'वुई आर ऑल खालीद सैद' या फेसबुक पेजद्वारे शांततेच्या मार्गाने क्रांती घडवून आणली. परिणामी, इजिप्तमधील हुकूमशाही राजवट नष्ट होऊन लोकशाही आली. तथापि, आपल्या येथे या साईटचा 'सोशल नेटवर्र्किंग' ऐवजी असामाजिक कामासाठीच अधिक वापर केला जात आहे. त्यामुळे मनाचा तोल ढळत आहे. संवेदनशीलता वाढत आहे. अशाच प्रकारे संवेदनशीलतेची जागा धार्मिक असुरक्षिततेने घेतली आहे. तसे पाहता विज्ञानाचा वापर मानवी उत्थानासाठी व्हायला हवा. पण, वैज्ञानिक सुविधांचा वापर आता धर्मा-धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याकरिता होत आहे, हा आत्मपरीक्षणाचा विषय आहे. फेसबुकवरील एका चित्रामुळे दंगलीसदृश स्थितीचे वातावरण निर्माण झाले. परिणामी, सामाजिक सलोख्याच्या परंपरेला गालबोट लागले. तूर्तास शांतता आहे. पण, धार्मिकस्थळाची विटंबना करून सामाजिक वातावरण दूषित करणे, ही बाब अत्यंत निंदनीय आहे. असा प्रकार करण्याविरुद्ध कारवाई व्हायलाच हवी. पण, याविरुद्ध असंवैधानिक मार्गाने भावना व्यक्त करून सर्वसामान्य व्यक्ती आणि घटनेशी काहीही संबंध नसलेल्या निर्दोष नागरिकांना वेठीस धरणे याचेही सर्मथन करणे उचित नाही. या घटनेमुळे संतप्त झालेल्या काहींनी युवकांनी रस्त्यावर दगडफेक केली. रस्त्यावरील गाड्यांची नासधूस केली. एका दुचाकीला पेटवून दिले. काही दुकानातील सामान रस्त्यावर फेकले, हे योग्य नाही. हा प्रकार शांततेचे शहर म्हणून ओळखल्या जाणार्या कारंजाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला. त्यामुळे शहराची प्रतिमा मलीन झाली.
दरम्यान, फेसबुकचा होत असलेला गैरवापरही अधोरेखित झाला आहे. एक सशक्त मीडिया, सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ, विचारपीठ असा फेसबुकचा वापर करता येतो. पण, काहींना याचा विसर पडला आहे.
त्यामुळे आता या साईटवर प्रसारित होणारे चित्र, चलचित्र व्यक्त केले जाणारे विचार यांचेही संपादन आवश्यक बनले आहे; अन्यथा समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा फार मोठा स्रोत फेसबुक बनेल, यात शंका नाही.

Vikas Deshmukh
at karda, tq Risod, dist Washim
शनिवार, १२ नोव्हेंबर, २०११
डाव
तिसरे अपत्य झालेल्या सरपंचाला
नागरिक म्हणाला-
''हा कायद्यावर घाव आहे''
त्यावर सरपंच चिडून म्हणाला-
''खामोश हा विरोधकांचा डाव आहे..!''
- Vikas V. Deshmukh
At. Karda, TQ. Risod, dist. Washim
mb- 9850602275
बुधवार, ९ नोव्हेंबर, २०११
यांना आता..!
टाळ कुटू कुटू
शिणले रे हात
पिढ्यांचा हा घात
केला कुणी...?
वारकरी भोळे
विचारला टाळे
अधू झाले डोळे
विठ्ठलाचे..!
ओळख ग धोका
वाचवा रे चोखा
तुका म्हणे ठोका
यांना आता..!
-विकास वि. देशमुख (Vikas Deshmukh)
मु. करडा, पोस्ट मोठेगाव ता. रिसोड, जि. वाशीम
9850602275
शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०११
तंटामुक्त गाव मोहीम कुणासाठी?
राज्य शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचे हे पाचवे वर्ष आहे. मागील चार वर्षात राज्यातील हजारो गावे तंटामुक्त झाली आहेत (?). अनेक पत्रकारांना पुरस्कार देऊन लखपतीही केले आहे. (यात मीही एक आहे). पत्रकारांना पुरस्कार असल्याने या मोहिमेचा इतर योजनेपेक्षा खूप गाजावाजा होत आहे. पण, त्या तुलनेत ही मोहीम यशस्वी ठरली नाही. या मोहिमेचा पत्रकारांनासाठी असलेलेला अमरावती विभागाचा पहिल्या क्रमांकाचा एक लाखाचा पुरस्कार (सन २००९-१०) मला मिळाला आहे. त्यापूर्वी माझ्या जिल्ह्यातील गजानन वाघ यांना राज्यातून तिसरा आणि सुनील काकडे यांना विभागाचा पहिला पुरस्कार मिळाला. पण, या तीन वर्षात आमच्या वाशीम जिल्ह्यातील केवळ चारच गावे तंटामुक्त झाली. परंतु आम्ही शेकडो बातम्या छापल्या. त्यामुळे राज्यशासनाची ही मोहीम केवळ पत्रकारांनासाठी आहे काय? असे वाटत आहे. पुरस्काराची रक्कम मोठी म्हणून पत्रकारही या मोहिमेच्या एकाच बाजूने लिहित आहेत.
(vikas Deshmukh Washim.)
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)