राज्य शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचे हे पाचवे वर्ष आहे. मागील चार वर्षात राज्यातील हजारो गावे तंटामुक्त झाली आहेत (?). अनेक पत्रकारांना पुरस्कार देऊन लखपतीही केले आहे. (यात मीही एक आहे). पत्रकारांना पुरस्कार असल्याने या मोहिमेचा इतर योजनेपेक्षा खूप गाजावाजा होत आहे. पण, त्या तुलनेत ही मोहीम यशस्वी ठरली नाही. या मोहिमेचा पत्रकारांनासाठी असलेलेला अमरावती विभागाचा पहिल्या क्रमांकाचा एक लाखाचा पुरस्कार (सन २००९-१०) मला मिळाला आहे. त्यापूर्वी माझ्या जिल्ह्यातील गजानन वाघ यांना राज्यातून तिसरा आणि सुनील काकडे यांना विभागाचा पहिला पुरस्कार मिळाला. पण, या तीन वर्षात आमच्या वाशीम जिल्ह्यातील केवळ चारच गावे तंटामुक्त झाली. परंतु आम्ही शेकडो बातम्या छापल्या. त्यामुळे राज्यशासनाची ही मोहीम केवळ पत्रकारांनासाठी आहे काय? असे वाटत आहे. पुरस्काराची रक्कम मोठी म्हणून पत्रकारही या मोहिमेच्या एकाच बाजूने लिहित आहेत.
(vikas Deshmukh Washim.)